आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबारातील जखमी व्यावसायिकाचा मृत्यू:सव्वा महिन्यापूर्वी परप्रांतीयाने केला गोळीबार

पारनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परप्रांतीय बांधकाम कामगारांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या स्वप्नील आग्रे या होतकरू बांधकाम व्यावसायिकाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान ३९ व्या दिवशी नगर येथील खासगी रुग्णालयात स्वप्नीलचा मृत्यू झाला. सव्वा महिन्यांपूर्वी २७ सप्टेंबर रोजी मांडओहोळ परिसरातील निर्जन ठिकाणी गोळीबाराचे थरार नाट्य घडले होते. घराकडे निघालेल्या स्वप्नीलची मोटार अडवून परप्रांतीय कामगारांनी गावठी कट्ट्यातून अगदी जवळून स्वप्नीलवर गोळीबाराच्या चार फैरी झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या छातीच्या उजव्या भागात, तर दोन पोटात शिरल्या होत्या. गोळीबारानंतर तीनपैकी दोन हल्लेखोर स्वप्नीलची मोटार घेऊन, तर एक हल्लेखोर मोटारसायकल वरून पसार झाले होते. दोन हल्लेखोरांना वारणवाडी येथील ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर एका हल्लेखोराला पोलिसांनी आळेफाटा (पुणे) येथून ताब्यात घेतले. शक्तीनारायण राय, नितीश गुड्डू यादव, रिसू यादव अशी आरोपींची नावे असून ते सध्या अटकेत आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या स्वप्नीलला घटनास्थळावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर स्वप्नीलला स्वप्नीलला नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तातडीने शस्त्रक्रिया करून स्वप्नीलच्या शरीरातील चार गोळ्या काढण्यात आल्या होत्या. स्वप्नील उपचाराला प्रतिसाद देत होता. मात्र गुरुवारी स्वप्नीलची तब्येत बिघडली व शुक्रवारी मृत्यूने त्याला गाठले. आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादामुळे स्वप्नीलवर गोळ्या झाडल्याचे हल्लेखोरांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. मात्र आर्थिक व्यवहारातून स्वप्नीलचा कोणाशीही वाद नव्हता. कोणाची देणेदारी बुडवण्याचा स्वप्नीलचा स्वभाव नव्हता आणि कारणही नव्हते असे स्वप्नीलच्या कुटुंबांचे म्हणणे आहे. त्यामुळे हल्ल्याबात गूढ अद्याप कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...