आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:पूरक आहार वाटपाची चौकशी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील प्राथमिक व उच्चप्राथमिक शाळांमध्ये पोषण आहाराबरोबरच पुरक आहार देण्याचे निर्देश आहेत. तथापि, बहुतांश शाळांमधून पोषण आहार गायब झाला असून, आहार वाटपात अनियमितता होत असल्याचा संशय प्रशासनाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

जिल्ह्यात पहिली ते पाचवीचे २ लाख ८५ हजार ३१ तर उच्च प्राथमिक १ लाख ८७ हजार ८६३ विद्यार्थी आहेत. इंधन व भाजीपाल्यासाठी प्राथमिक प्रतिविद्यार्थी २ रूपये ८ पैसे तर उच्च प्राथमिकच्या विद्यार्थ्यावर ३ रूपये ११ पैसे खर्च शाळा व्यवस्थापनाला दिला जातो. या रकमेतून आठवड्यात एकदा पुरक आहार देणे अपेक्षित आहे.

परंतु, पोषण आहारातच मुलांची बोळवण करून, पुरक आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार चर्चेत आला आहे. याप्रकरणी दिव्य मराठीने ६ डिसेंडरला लक्ष वेधले होते. त्यानंतर प्राथमिक विभागाचे जिल्हाशिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी स्थानिक पातळीवर चौकशीचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालकांनाही विचारावे
पोषण आहार वाटपाची चौकशी करताना, पुरक आहाराबाबत विद्यार्थ्यांसह काही पालकांनाही विचारणा करायला हवी. शाळांमध्ये पुरक आहार दिला जातो की नाही, याची खातरजमा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.''-भास्कर पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...