आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:मुद्देमाल गहाळ झाल्याप्रकरणी चौकशी सुरू; पोलिस अधीक्षक पाटील यांची माहिती

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्याची प्रक्रिया नगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आतापर्यंत १५० दुचाक्या, तसेच २४ सोन्या-चांदीच्या वस्तू परत करण्यात आल्या. याच दरम्यान पोलिस ठाण्यातील मुद्देमालाची तपासणी सुरू असून, शिर्डी व कोतवाली दोन पोलिस ठाण्यांमध्ये मुद्देमाल गहाळ झाल्याप्रकरणी चौकशी सुरू झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. अधीक्षक पाटील म्हणाले की, पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अपघात झालेली वाहने आणून टाकली जातात. पोलिसांना अपघातातील वाहने जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. अपघात झाल्यावर पंचनामा करुन वाहन सोडून देणे अपेक्षित आहे. पोलिस ठाण्यात अशा प्रकारची पडून असलेली वाहने, तसेच कारवाईत हस्तगत करण्यात आलेली व बेवारस अवस्थेत असलेली वाहने संबंधित नागरिकांना परत करण्याची मोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत विविध ८०८९ मुद्देमाल परत करण्यात आला आहे. मुद्देमाल तपासणीनंतर काही ठिकाणी मुद्देमाल गहाळ झाल्याचे, तर काही ठिकाणी सापडत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिर्डी येथे चौकशी सुरू आहे.

मौल्यवान मुद्देमाल आता लॉकरमध्ये!
मौल्यवान वस्तूंचा मुद्देमाल सुरक्षित राहावा, यासाठी आम्ही संबंधित डीवायएसपीना तो मुद्देमाल बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची मुभा दिलेली आहे. '' मनोज पाटील, पोलिस अधीक्षक.

बातम्या आणखी आहेत...