आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मिरवणूक मार्ग व कोठला परिसराची पाहणी केली. बंदोबस्त व उपाययोजनांबाबत आढावा घेऊन सूचना दिल्या. काही विश्वस्तांशी त्यांनी चर्चा केली.
काही दिवसांवर मोहरम सण येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाच्यावतीने जिल्हास्तरावर तसेच पोलिस स्टेशन स्तरावर शांतता कमिटीच्या बैठकांचे आयोजन करून मोहरम शांततेत तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून पार पाडण्याचे आवाहन केले.
या बैठकांदरम्यान शहरातील ज्या मार्गावरून मोहरमच्या मिरवणुका निघणार आहेत, त्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच मिरवणुकीदरम्यान महावितरणच्यावतीने विजेची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली होती. नागरिकांच्या या सूचनांची दखल घेत उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका व महावितरण प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
कोठला आणि सवार्यांचे विसर्जन होणाऱ्या ठिकाणांची पाहणीही करण्यात आली. मोहरम उत्सवात डिजेला परवानगी दिली जाणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. चादर घेऊन येणाऱ्या यंग पार्टी व मंडळांसाठी किमान दहा जणांची नावे देऊन परवानगी घेणे बंधनकारक आहे. पोलिस प्रशासनाकडून केवळ दोन स्पीकरसाठी परवानगी दिली जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळंंके यांच्यासह गोपनीय शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.