आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक मार्ग:महानिरीक्षक शेखर यांच्याकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर यांनी शुक्रवारी वाहनातून फिरून पाहणी केली. शहरातील रस्त्यांची दुरवस्था व त्यामुळे महानिरीक्षक शेखर यांनी पायी न फिरता चार चाकी वाहनातूनच मार्गाची पाहणी केली असावी, अशी चर्चा रंगली आहे.यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार यावेळी उपस्थित होते.

१० दिवसांच्या गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांकडून दक्षता येण्यात येत आहे. नगर शहरासह जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. आता विसर्जन मिरवणूकीची तयारीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. गुरूवारी महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे येथे भेट देत सूचना केल्या. शुक्रवारी सकाळी त्यांनी नगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

विसर्जन मिरवणूक मार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या विजेच्या तारा, रस्त्याच्या कडेला पडलेले दगड, वीट, मातीचे ढिगारे, खड्डे बुजवण्यासाठी मनपाशी पत्रव्यवहार करून अडथळे दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, महानिरीक्षक शेखर यांनी त्यांच्या वाहनातूनच मार्गाची पाहणी केल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला. रस्त्यांची दुरावस्था व खड्डे, पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे त्यांनी वाहनातूनच पाहणी करणे पसंत केले असावे, अशी चर्चाही रंगली आहे

बातम्या आणखी आहेत...