आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:मानवसंसाधन शाखेचे निरीक्षक खाडे यांची बेलवंडी ठाण्यात बदली

श्रीगोंदे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षक कार्यालयातील मानवसंसाधन शाखेचे निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांची बेलवंडी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त असणाऱ्या बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये आता नव्याने मच्छिंद्र खाडे यांची नियुक्ती झाली. शुक्रवारी त्यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे पदभार स्वीकारला,त्यांना या पूर्वी नक्षलवादी भाग गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक शहर, पुणे शहर, लोहमार्ग मुंबई, सांगली, सोलापूर, नवी मुंबई,व नांदेड मध्ये सीआयडी, तसेच अहमदनगर मधील श्रीरामपूर येथे कामाचा अनुभव आहे.

आता श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी, चोरी-दरोडे,अवैध धंदे, जुगार मटका, वाळू तस्करी, संघटीत गुन्हेगारी टोळ्या मोठी गुन्हेगारी थांबवणे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

बातम्या आणखी आहेत...