आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी सायकलपटू:लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या प्रेरणेतून पार्थने सायकलिंगमध्ये केला विक्रम, 30 तासांत पार केले 520 किमीचे अंतर

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना लॉकडाऊनमुळे जगात सर्वत्रच व्यवहार ठप्प झाले होते. या काळात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचे वातावरण होते. मुले मोबाइलवर गेम खेळण्यात दंग होती. पण, याच लॉकडाऊनमध्ये आशेचा किरण शोधून संगमनेरच्या 16 वर्षीय पार्थ तवरेजने सायकल चालवण्याचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी होऊन त्याने पहिल्याच प्रयत्नात औरंगाबाद ते सोलापूर व सोलापूर ते औरंगाबाद हे अंतर 520 किमीचे अंतर 30 तासांत पार केले.

लॉकडाऊनमध्ये मुले मोबाइलप्रेमी झाली होती. पण, संगमनेरच्या पार्थ सचिन तवरेजने त्या काळात सायकल चालवण्याचा ध्यास घेतला. तो सुरुवातीला संगमनेर परिसरातील घाटात साध्या सायकलीने चालवायला लागला. त्यानंतर तो हळूहळू मित्रासोबत 50 किमींपर्यंत सायकल चालवू लागला. एकेदिवशी त्याने 110 किमीपर्यंत पहिली मोठी राईड पूर्ण केली. त्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला की आपण काहीतरी वेगळे करू शकू. पण घरच्यांनी दहावीचे वर्ष असल्याने त्यास सायकलिंग करण्यास विरोध केला.

त्याचवेळी त्याच्या मित्राने सायकलिंगमध्ये 450 किमीचा विक्रम केला. त्या मित्रापासून त्याने प्रेरणा घेत त्याने आपणही मोठ्या सायकल स्पर्धेत सहभाग घेऊन विक्रम करू शकतो, असा निर्धार त्याने केला. यासाठी त्याने यूट्यूब वर त्याचे रोल मॉडेल असलेल्या सायकलपटूंचे पेज फॉलो केले. आई-वडील यांचेही त्याला मार्गदर्शन त्याला मिळाले. पार्थने 28 मे रोजी औरंगाबाद - सोलापूर - औरंगाबाद हे 520 किमीचे अंतर अवघ्या 30 तासांत पार केले.

मोबाइलमुळे निर्माण होताे मानसिक तणाव

मोबाइलची मलाही आवड होती, त्यातील गेम आवडायचे पण सारखे मोबाइलवर गेम खेळत असल्याने मानसिक तणाव यायचा. घरात राहण्याचा कंटाळा आल्याने सायकलिंगकडे वळालाे. सायकलिंगच्या बीआरएम किंवा 600 किमीच्या स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा होती पण वयामुळे त्यात भाग घेऊ शकलो नाही, असेही तो म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...