आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा नेवासे बुद्रूक येथे विश्वेश्वर श्रीनाथबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते व संत महंतांच्या उपस्थितीत वेदमंत्राच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, श्रीराम साधना आश्रमाचे सुनीलगिरी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे श्रीरमेशानंदगिरी महाराज, मुक्ताई देवस्थानचे श्रीगोपालानंदगिरी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे बालयोगी ऋषिनाथजी महाराज, कोंडीराम महाराज पेचे, बाळकृष्ण महाराज कानडे, मंदिर पुजारी ज्ञानेश्वर सुरोशे, मंदिर विश्वस्त मंडळाचे मार्गदर्शक ज्ञाननाथ जायगुडे, अण्णाभाऊ पेचे, प्रभाकर जायगुडे, बाळासाहेब जायगुडे, भानुदास रेडे, माजी सरपंच बाबा कांगुणे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे आदी उपस्थित होते.
यानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी घोडेस्वार, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व नाथबाबांची प्रतिमा व पादुका सजवण्यात आलेल्या रथात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या पालखी रथातील पादुकांचे सुवासिनींनी दर्शन घेतले. होमहवन कार्यक्रमाची सांगता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते होम कुंडात श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देऊन करण्यात आली. पौरोहित्य भेंडे येथील आचार्य गणेशदेवा गुरू व ब्रम्हवृंद मंडळींनी केले. उपस्थित भाविकांना नेवासे बुद्रूकचे मूळ रहिवासी व पुणे येथील सेवेकरी रवींद्र मुनोत यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विश्वेश्वर नाथबाबा उजैनहून नेवासे बुद्रुक येथे आले. अमृतवाहिनी प्रवरामाई परिसर पाहून ते येथेच स्थिरावले. पदयात्रा करत असताना शिर्डीचे साईबाबांचा सहवास त्यांना येथे लाभला म्हणून ते साईबाबांचे गुरुबंधू होते. देवगडचे श्रीसमर्थ सदगुरू किसनगिरी बाबांनी नाथबाबांना गुरू केले होते. याच क्षेत्री राहून नाथबाबांनी येथेच तपश्चर्या केली. समाधीही घेतली असा महिमा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.