आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाली असून नुकतीच चोंडीत नियोजन बैठक संपन्न झाली. या निवडणुकीत तगडे उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे आमदार राम शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणूकीच्या नियोजनासाठी आमदार राम शिंदे यांनी भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीतून सर्वच कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.
जामखेड बाजार समितीच्या निवडणूक नियोजनासाठी आमदार राम शिंदे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आज चौडीत जामखेड तालुक्याचा आढावा घेतला. या बैठकीत निवडणूकीचे गणित मांडण्यात आले. बाजार समितीसाठी सक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यावी, असा सुर या बैठकीत निघाला. जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत, सर्वांना विश्वासात घेऊन पुढील रणनिती ठरवण्यात येईल, ही निवडणुक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
गावोगावच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद आपल्या उमेदवारांच्या पाठीशी लावावी, या निवडणुकीत आपल्या पॅनलकडून तगडे उमेदवार दिले जाणार आहेत, उमेदवार निवडताना कोणाचाही वशिला चालणार नाही, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी यावेळी बैठकीत केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, सोमनाथ पाचारणे, आप्पासाहेब ढगे, उदयसिंग पवार, प्रविण चोरडिया, डाॅ. अल्ताफ शेख, आप्पासाहेब ढगे, बिट्टु मोरे, गणेश जगताप, गौतम कोल्हे, राम पवार, वैभव कार्ले, अजय सातव, राहुल चोरगे, गणेश शिंदे, बाजीराव गोपाळघरे, तुकाराम कुमटकर, बाळासाहेब बोराटे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.