आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी’च्या वृत्ताने प्रशासन जागे:वेठबिगार, बालकामगारांवरील अत्याचार रोखण्यासाठी पथक स्थापन करण्याचे निर्देश

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील सहा बालकांना एक मेंढी व दोन हजार रुपयांत विकल्याच्या घटनेनंतर अखेर सोमवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हास्तरीय वेठबिगार समितीचे आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक स्थापन करण्याचे निर्देश देतानाच सामाजिक संस्थेच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्याची सूचना त्यांनी सोमवारी दिली.

दिव्य मराठीने वेठबिगारीचे हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. ८ सप्टेंबरला ‘दिव्य मराठी’ने चिमुकल्यांचा मेंढर बाजार असे वृत्त प्रकाशित केले होते. पाच हजार रुपयांच्या बदल्यात इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजातील मुलांच्या वेठबिगारीच हे प्रकरण होते.

नगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील सहा बालकांना एक मेंढी व दोन हजार रुपयांत विकत घेऊन त्यांच्यावर अत्याचार करून मजुरी करून घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजत असून ,याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

घटनेची गंभीर दखल घेऊन सोमवारी ( १२ सप्टेंबर) ला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. अहमदनगर जिल्ह्यातील वेठबिगार व बालकामगार यांच्यावर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी व भविष्यात त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत, यासाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मेंढपाळांकडे असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...