आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 दुचाकी हस्तगत:दुचाकी चोरांची आंतरजिल्हा टोळी पकडली

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडली. त्यांच्याकडून १७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

शेख अकिल शेख खलील (वय ४९), शेख मंजुर अनिस अहमद (वय ३१), मुकर्रस मुस्तफा सय्यद (तिघे रा. भवानीनगर, औरंगाबाद), आयुब याकुब सय्यद (रा. विळद ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेख अकील व त्याचा साथीदार चोरीच्या दुचाकी नगरकडे घेवून येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे, भिंगार कॅम्पचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, अंमलदार मनोहर शेजवळ, संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, भानुदास खेडकर, राहुल व्दारके, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, महादेव निमसे, संभाजी कोतकर व संजय काळे यांच्या पथकाने हॉटेल सनी पॅलेस येथे सापळा लावून शेख, अहमद यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...