आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री व धनश्री फंड यांचा पवार यांच्या हस्ते सन्मान

श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. महाराजा कॉलेजचे लाडके आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री फंड व धनश्री फंड यांना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी बोलून विशेष सत्कार केला.

याप्रसंगी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, रामशेठ ठाकूर, दादा कळमकर, आमदार आशुतोष काळे, राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, संस्थेचे सचिव डॉ. प्राचार्य विठ्ठलराव शिवरकर, सहसचिव प्राचार्य संजय नागपुरे, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के इतर सर्व मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांनी फंड भगिनींचे कौतुक करून राष्ट्रकुल व ओलंपिक स्पर्धेमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. भाग्यश्री फंड व पवार यांची भेट व्हावी यासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस साहेब यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...