आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:जानेवारीत माहेश्वरी समाजाचे परिचय संमेलन ; योग्य जोडीदाराची निवड करता येणार

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान युवक मंडळाने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, माहेश्वरी समाज आणि मालपाणी परिवाराच्या सहयोगाने नूतन वर्षातील ८ जानेवारी रोजी मालपाणी हेल्थ क्लब येथे अखिल भारतीय विवाह योग्य माहेश्वरी युवक-युवतींसाठी परिचय संमेलनाचे आयोजन केले आहे. १० वर्षांपासून आयोजित होणार्‍या या संमेलनातून मुला-मुलींना मनासारखे स्थळ मिळाले आहेत. होणार्‍या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी केले आहे. संमेलनात एकाचवेळी देशभरातील विविध ठिकाणची स्थळे प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार आहे.

नियोजन, प्रतिसाद व भव्यता यामुळे संमेलनांच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत राहिला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून समाजातील युवक-युवती पालकांसह उपस्थित राहतात, हे संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. इच्छुकांनी २५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोंदणी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संमेलनात नावेनोंदणी झालेल्या युवक-युवतींची परिपूर्ण माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी होणार आहे. या माध्यमातून पाल्यासाठी योग्य जोडीदाराची निवड करता येणार आहे. संमेलनस्थळी अनेक प्रकारच्या सुविधांसह पत्रिका जुळविण्यासाठी संगणक व पंडित यांची सोय करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...