आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:मेटे यांच्या अपघाताची चौकशी करा : शेटे

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करा अशी मागणी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेटे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक मेटे यांचे १४ ऑगस्टला पुणे -मुंबई महामार्गावर अपघाती निधन झाले. हा अपघात आहे की घातपात आहे, असा संशय निर्माण होत आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने सत्य बाहेर आणावे. ही चौकशी निःपक्ष होईल, अशी अपेक्षा शिवसंग्राम पक्षाची आहे. निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी. अन्यथा सकल मराठा समाज व शिवसंग्राम पक्षाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा शेटे यांनी निवेदनाद्वारे दिला.

यावेळी शिवसंग्रामचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ ईसरवाडे, जिल्हा सरचिटणीस संदीप बामदळे, ओंकार बडाख, सोपान रावडे, सुनील पैलवान, मीरा गुंजाळ आदी उपस्थित होते. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात ऐतिहासिक स्मारक उभारणे, शेतकरी पेन्शन योजना सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुलांसाठी वस्तीगृह उभारणे व इतर समाजहिताच्या प्रश्नांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका मेटे यांनी घेतली होती, असे शेटे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...