आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:रस्तापूर-फत्तेपूर रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा

कौठा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी डांबरीकरणाचे काम रस्तापूर ते फत्तेपूर या ६०० मीटर काम संबंधित कंपनीकडून करण्यात आले. या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली. या बोगस कामाची क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करावी, अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचे रस्तापूर गावचे संरपच वसंतराव उकिर्डे व उपसरपंच बापूसाहेब अंबाडे यांनी सांगितले.

नेवासे तालुक्यातील रस्तापूर ते फत्तेपूर हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून एक वर्षापूर्वी करण्यात आला. पंरतु उर्वरित ६०० मीटर रस्ता गावापासून ते अंबाडे वस्तीपर्यंत नुकताच आठ ते दहा दिवसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. पंरतु हे काम निकृष्ट दर्जाचे झाले. सिलेकोट, कारपेट याची साईज अत्यंत कमी वापरली असून रस्त्यावरील डांबर निघत आहे. डांबरीकरणाची साईज नगण्य वापरली आहे. साईडपट्ट्याला कमी प्रमाणात मुरुम व माती टाकून धोकादायक बनवला आहे.

बातम्या आणखी आहेत...