आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक गुन्हे:बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. कोतवाली पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी मधील बनावट सोनेतारण प्रकरणाचा तपास सुरू आहे. शहर बँकेत आत्तापर्यंत ८९३३ ग्रॅम म्हणजे सुमारे नऊ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत.

याप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, ३.२२ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही काही कर्जदारांची खाती तपासण्याचे काम सुरू आहे. तर संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये ८५६४ ग्रॅम म्हणजे सुमारे साडेआठ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. या गुन्ह्यात ५३ आरोपींचा समावेश असून आत्तापर्यंतच्या तपासणीत २.८८ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नागेबाबा मल्टीस्टेट मधील संशयित खात्यांपैकी केवळ ५० ते ६० टक्केच खात्याची तपासणी झाली. अद्याप मोठ्या प्रमाणात खात्यांची तपासणी बाकी आहे.

या दोन्ही गुन्ह्यात मिळून सुमारे ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आतापर्यंतसमोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक देशमुख यांच्यामार्फत हा तपास केला जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...