आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात प्राथमिक व उच्च माध्यमिकच्या सुमारे ४ लाख ७२ हजार ८९४ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर दरमहा तब्बल २ कोटी २५ लाखांचा खर्च होतो. तसेच भाजीपाला व इंधन खर्चातून पूरक पोषण आहार दिला जातो. पूरक आहार आठवड्यात एकदा देणे अपेक्षित, असताना वाटपात मात्र, निकषाप्रमाणे नियमितता आहे की अनियमितता याबाबत थेट विद्यार्थ्यांशी संवाद करण्याची भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून प्राथमिक व उच्चप्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देण्याची योजना आहे. ही योजना राबवण्यासाठी जिल्ह्यात साडेआठ हजार मदतनिसांची नेमणूक केली आहे. पहिली ते पाचवीचे २ लाख ८५ हजार ३१ तर उच्च प्राथमिक १ लाख ८७ हजार ८६३ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी दरमहा सुमारे २ कोटी २५ लाखांचा खर्च येतो. याव्यतिरिक्त प्रतिविद्यार्थी इंधन व भाजीपाल्यासाठी प्राथमिक प्रतिविद्यार्थी २ रूपये ८ पैसे तर उच्चप्राथमिकच्या विद्यार्थ्यावर ३ रूपये ११ पैसे खर्च येतो.
या रकमेतून आठवड्यात एकदा पुरक आहार देणे अपेक्षित आहे. पूरक आहारात राजगिरा चिक्की, शेंगदाणा चिक्की, खोबरे चिक्की, ड्रायफ्रुट आदी शक्य ते दिले जाते. विद्यार्थ्यांची उपस्थिती पोर्टलवर नोंदवून रक्कम शाळाव्यवस्थापन समितीला दिली जाते, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
परंतु, काही खासगी व जिल्हा परिषदांच्या शाळांत आठवड्याऐवजी महिन्यात एकदा किंवा दोनदाच पुरक आहार दिला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने आता थेट विद्यार्थ्यांनाच विचारण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या.
भरारी पथकाचा कटाक्ष
भरारी पथकांमार्फत तपासणी सुरू आहे. काही शाळांना ड्रायफ्रुट दिल्याची चांगली बाबही समोर आली. पुरक आहार नियमिती वाटप होतो की अनियमीत याकडे पथकाचा कटाक्ष असेल.''-अशोक कडूस, जिल्हा शिक्षणाधिकारी, माध्य.
पूरक आहाराबाबत विद्यार्थ्यांना विचारणार
अधीक्षक तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी िवद्यार्थ्यांना विचारून निकषाप्रमाणे नियमीत पुरक आहार मिळतो, की नाही याबाबत विचारणा करावी, अशा सूचना दिल्या आहेत.'' -भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.