आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाक् युद्ध:शिवसेना युपीएचा घटक पक्ष नाही, संजय राऊतांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- नाना पटोले

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा रिपोर्ट मंत्र्यांनी तयार केला हा फडणवीसांचा आरोप बालिशपणाचा

शिवसेना युपीएचा घटक पक्षही नाही, संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही, असे खडे बोल सुनावतानाच संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत काय? असा बोचरा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना केला.

सयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर बोलताना पटोले यांनी राऊत यांना खडेबोल सुनावले. सोनिया गांधी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. शिवाय शिवसेना युपीएचा घटक पक्षही नाही. राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. युपीएची चिंता संजय राऊत यांनी करू नये, असे पटोले यांनी सुनावले. संजय राऊत हे आता शरद पवार यांचे प्रवक्ते झाले आहे. ते शिवसेनेचे खासदार वा प्रवक्ते राहिलेले नाही, असा चिमटाही पटोले यांनी काढला. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे करू, असे ते म्हणाले.

सरकारने फडणवीसांची चौकशी करावी

महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपाचे राज्यातील नेते सैरभैर झाले आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यात आघाडीवर आहेत. फडणवीस हे बेछूट आणि बेलगाम आरोप करीत असून सातत्याने खोटे बोलीत आहेत. केंद्रीय तपासणी यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीसांचीही चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

चौकशीत सत्य समोर येईल

कोणत्याही अधिकाऱ्याने कुठल्याही सरकारची कठपुतळी होऊन काम करू नये. काही अधिकारी पक्षाला समर्पित होऊन काम करतात हे लोकशाहीला घातक असल्याचे रश्मी शुक्ला फोन टॅपींग प्रकरणावर बोलताना सांगितले. रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीत सत्य समोर येईलच, असे ते म्हणाले.

फडणवीसांचा आरोप बालिशपणाचा

गृहमंत्री अनिल देेशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची निवृत्त पोलिस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांनी चौकशी करावी, असे शरद पवार यांनी सुचवले आहे. आम्ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशमार्फत चौकशीची मागणी केली आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, असे पटोले म्हणाले. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा रिपोर्ट मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केला. मात्र हा रिपोर्ट मंत्र्यांनी तयार केला हा फडणवीसांचा आरोप बालिशपणाचा आहे, असे पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...