आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीचे ज्ञान:सेंद्रिय शेतीतून इस्रायल; नेदरलँडसारखी प्रगती साधावी, सुप्रसिध्द सेंद्रिय शेती तज्ञ व रोमीफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे मत

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायल, नेदरलँड देशांनी प्रतिकुल परिस्थितीत सेंद्रिय शेतीतुन प्रगती साधली आहे. गांडुळाच्या विविध प्रजाती. गांडूळ पालन व गांडूळ खत निर्मितीद्वारे उद्योजकता विकास व्हावा. शाश्वत शेती, आरोग्य व पर्यावरणाचे जतन व्हावे, यासाठी शेतीत सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर केला पाहीजे. गांडुळ खत सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे, त्यावर भर देण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिध्द सेंद्रिय शेती तज्ञ व रोमीफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी केले.

संगमनेर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व संगमनेर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने ‘गांडूळ पालन आणि गांडूळ खत निर्मितीद्वारे उद्योजकता विकास’ या विषयावर आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. नाईकवाडी बोलत होते. उद्घाटन शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य अरुण ताजणे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना भवरे, डॉ. दिपक गपले, डॉ. रुपेंद्र भागडे, प्रा. श्रीहरी पिंगळे, डॉ. प्रियंका डुबे, प्रा. सुप्रिया म्हस्के, प्रा. तनुजा सहाणे यावेळी उपस्थित होते.

ताजणे म्हणाले, सेंद्रीय शेती काळाची गरज आहे. यामुळे किड व रोगावर नियंत्रण राहते. जमिनीचे आरोग्य राखण्यास सेंद्रिय खत मदत करते. शेती व्यवसाय शेतकरी वर्गाचे उपजीवीकेचे प्रमुख साधन असल्याने तो टिकविण्यासाठी सेंद्रिय पध्दतीचा वापर झालाच पाहिजे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीचा विचार न करता उद्योजक व्हावे. इतरांना नोकरी देण्याची क्षमता विकसीत करावी. व त्यांनी शेती पुरक व्यवसायाकडे कल वाढवावा. असे आवाहन डॉ. अरुण गायकवाड यांनी केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. वंदना भवरे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सुप्रिया म्हस्के यांनी तर आभार डॉ. रुपेंद्र भागडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...