आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी मंगळवारपासून ( १४ मार्च) संपावर जाणार आहेत. संप काळात अत्यावश्यक सेवा नियमित सुरू राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. दरम्यान, संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात याव्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत सालीमठ बोलत होते. ते म्हणाले, कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता, नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा.
संप काळात कार्यालये नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची व्यवस्था जबाबदार अधिकाऱ्यांकडे द्यावी. आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्या , असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले. परीक्षेत अडथळा येऊ देऊ नका सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असून, त्यात अडथळा येऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करावे. विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करू नये. जनतेला सेवा मिळण्यात अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.