आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:प्रलंबित शालार्थ आयडी त्वरित द्या अन्यथा संबंधितांवर कार्यवाही करा

राहुरी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्यता असताना शालार्थ आयडी दिला जात नसून आयडी नसल्याने गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे पगार बंद आहेत. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी त्वरित द्यावे अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाईची कार्यवाही करावी, ही मागणी शिक्षक भारती विनाअनुदान संघर्ष समितीच्या राज्य महिला अध्यक्षा रूपाली कुरुमकर यांनी केली.

पुणे विभागीय बोर्डाच्या अध्यक्षा वंदना वाव्हळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा होऊन लवकरच प्रश्न सोडविण्याचे आश्वासन वाव्हळ यांनी दिले. शिक्षक भारतीच्या विविध मागण्यांसाठी राज्यअध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कार्यवाह जालिंदर सरोदे, कोकण विभागाचे अध्यक्ष धनाजी पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, राज्य सचिव सुनील गाडगे, उपाध्यक्ष सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, कैलास रहाणे, दादासाहेब कदम, अमोल चंदनशिवे, माफीज इनामदार, संपत वाळके, संजय भालेराव, गणपत धुमाळ, आदींनी पाठिंबा दिला.यावेळी शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष जयवंत भाबड, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे,सरचिटणीस महेश पाडेकर,संजय तमनर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...