आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:ग्रामपंचायत हद्दीतील समस्यांचा तातडीने निपटारा करण्यात यावा; सुलतानपूर ग्रामस्थांची ग्रामपंचायत प्रशासनाला मागणी

सुलतानपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायत हद्दीतील समस्यांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघपाल नागवंशी यांच्या ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. मागील काही दिवसापासुन सण उत्सवाला सुरूवात झाली आहे. परंतु अद्यापही ग्रामपंचायत प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाॅर्ड क्रमांक १, ५, आणि ६ मध्ये सार्वजनिक रस्त्याला गटारीचे स्वरूप आले आहे.

त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यात मुरूम टाकून जाण्या योग्य रस्ता करण्यात यावा. मागासवर्गीयांना कुठले धार्मिक सामाजिक कार्यक्रम करायचे असतील तर त्यांना आज रोजी जागा उपलब्ध नाही. मरी माय देवीसाठी सात ते आठ गुंठे जागा देण्यात आली आहे. परंतु त्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्यात यावे, तसेच वॉर्ड क्रमांक १,५ व ६ या वॉर्डातील नाल्या गाळाने व घाणीने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे या वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. परिणामी गावात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे गावात धुळ फवारणी करून नाल्या साफ करण्यात याव्यात. एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा, गावातील प्रत्येक खांबावर पथदिवे लावण्यात यावे. स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालया समोर आक्रोश आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघपाल नागवंशी, अनित्य पनाड, घेवंदे, शेख अख्तर, संतोष शिंदे, शेख अमीर, ज्येष्ठ मन्नान पटेल, बंडू पडघान, राजहंस जावळे, किरण पनाड, विशाल पनाड यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...