आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या आरोग्य संपन्न राहणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी नियमित जीममध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. यात मार्गदर्शक म्हणून ओंकार गिरवले अतिशय चांगले योगदान देत आहेत. विविध शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवून ते नगरचा लौकिक वाढवत आहेत, असे प्रतिपादन सिटी जीमचे सहसंचालक राज मुनोत यांनी केले. सिटी जीमचे संचालक ओंकार गिरवले यांनी पुणे, श्रीरामपूर, धनकवडी येथील शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली.
या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी योगेश मुनोत, रितीक मुनोत, मनोज चौहान यांच्यासह सिटी जीमचे सदस्य उपस्थित होते. ओंकार गिरवले म्हणाले, सिटी जीमच्या माध्यमातून नगरमध्ये अतिशय उत्तम जीम उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी शास्त्रीय पद्धतीने प्रत्येकाला अनुरूप व्यायाम शिकवला जातो. शरीर सौष्ठव स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली याचा विशेष आनंद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.