आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामसुरक्षा यंत्रणेबाबत युवकांनी खेड्यापाड्यातून याबाबत जागृती करण्याची गरज आहे. ही यंत्रणा आपापल्या ग्रामपंचायत मार्फतच गावागावातून कार्यान्वित करता येते. याबाबत तरूणांनी जनजागृती करून अपात्कालीन ग्राम सुरक्षा संपर्क यंत्रणा सुरू करावी, असे आवाहन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रणेते डी. के. गोर्ड यांनी केले. टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२७०३६०० हा डायल केल्यानंतर ही यंत्रणा अपात्कालीन मदतीचे काम करते. ही संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आहे.
ग्रामसुरक्षा यंत्रणेचे जनक डी. के. गोर्डे, राजूरच्या सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे यांच्या संकल्पनेतून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर, गरज याविषयी राजूर येथील रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयासह अन्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गोर्डे यांनी हे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे उपस्थित होते. यावेळी डी. के. गोर्डे म्हणाले, सर्व गावांसाठी ही यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी अतिशय सोपी पध्दत आहे. दुर्घनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदतकार्य करता येते. नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारित होतात. नियमबाह्य व अपूर्ण संदेश रद्द होतात. हा संदेश १० किलोमीटर परिसरात तत्काळ जातो. गणेश इंगळे यांनी यंत्रणेचे फायदे समजावून सांगत ती कशी कार्यान्वित करावी याचे प्रात्यक्षिक दाखवले.
सर्व ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून यासाठीचा खर्च गावागावातून ग्रामपंचायतीतून करण्यास शासकीय अनुज्ञेय असल्याचेही त्यांनी सांगितले. सरपंच पुष्पा निगळे व उपसरपंच संतोष बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर यंत्रणेचे जनक डी. के. गोर्डे, सर्वोदय विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य बादशहा ताजणे, वकील दत्तात्रय निगळे व शिक्षक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.