आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच ऐतिहासिक व धार्मिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल. पुरात्न काळात समाजाच्या व धर्माचा इतिहास व त्याची रचना सोयी सुविधा ही आज्या पेक्षाही त्याकाळी प्रगत होती. त्यामुळे त्यांना या सर्व बाबींची माहिती असल्यास सध्या समाजामध्ये उद्भवणारे धार्मिक व सामाजिक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील. व समाजात एकोपा नांदेल, असे प्रतिपादन जागतिक दर्जाचे नाआत ख्वाह दानीश दावर यांनी केले.
बुऱ्हानगर येथील अली पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन सिटी लाॅन येथे आयोजित केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दावर, राष्ट्रीय उलमा कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना आमीर रश्दी, अब्दुल रशीद, मिफताही साहब, प्रबोधनात्मक व्याख्याते इरफान सय्यद बाळासाहेब शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष, हुजैफा आमीर रश्दी - अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे विद्यार्थी विभागाचे सचिव, गुलाम नबी शेख- महाराष्ट्र शासनाचे औषधी विभागाचे एसडीओ काझी, पुणेचे सामाजिक कार्यकर्ते इरशाद शेख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुलांनी सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय, देशभक्ती अशा अनेक विषयावर नाट्य सादर केले. व उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक करताना अन्जर अन्वर खान म्हणाले, लहान मुलांना त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासूनच समाजातील घडणाऱ्या चांगल्या व वाईट गोष्टीमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती दिल्यास व आपली मुलं तंत्रज्ञानाचे नावाखाली काय करत आहे याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जाणार नाही याची खात्री राहील असे नमूद केले. सूत्रसंचालन हाफिज़ असरार यांनी, तर आभार मोहम्मद अली खान व मोहम्मद अनस क़ुरेशी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.