आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:माणूस गेल्यावर त्याची उंची कळणे हे दुर्दैवाचे; आरोग्य अविनाश आदिक यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणूस जिवंत असल्यापेक्षा तो गेल्यानंतर त्याचे काम कसे होते, तो व्यक्ती किती उंचीचा होता हे कळते. त्याचप्रमाणे (स्व.) खासदार गोविंदराव आदिक यांचे काम किती मोठे होते, हे आता हळूहळू श्रीरामपूरकरांना कळायला लागले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले. साखर कामगार रुग्णालयात (स्व.)खासदार गोविंदराव आदिक यांच्या जयंतीनिमित्त साखर कामगार रुग्णालय, साईदीप हॉस्पिटल व महाराष्ट्र कृषक समाज यांच्या वतीने हृदयरोग तपासणी शिबिरात ते बोलत होते.

यावेळी पुष्पा आदिक, माजी नगराध्यक्ष साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त अनुराधा आदिक, हृदयरोग तज्ञ डॉ. किरण दीपक, डॉ. श्रीधर बधे, डॉ. रवींद्र जगधने, डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ. दिलीप पडघन, डॉ. महेश क्षिरसागर, डॉ. बापूसाहेब आदिक, डॉ. शरद सातपुते डॉ. आरती शिंदे, ज्ञानदेव आहेर, राम टेकवडे, बाळासाहेब आदिक, नितीन पवार, इंद्रभान थोरात, मल्लू शिंदे, चंपालाल फोपळे, सुरेश निमसे, कारभारी बडाख, सुनील थोरात, अॅड. जयंत चौधरी, हंसराज आदिक, अजय डाकले, उत्तम पवार, बापुसाहेब पटारे, अशोक थोरे, मुक्तार शहा, रईस जहागीरदार, अल्तमश पटेल, कलीम कुरेशी, अर्चना पानसरे, जयश्री जगताप, शिल्पा आव्हाड, रेवती चौधरी, राधिका कदम, शेखर दुबैय्या, सचिन बडदे, आदी उपस्थित होते.

आमदार लहू कानडे यांनीही शिबिराला भेट दिली. या शिबिरात २०५ रुग्णांची तपासणी करण्यात आले. डॉ. बधे म्हणाले की पूर्वी ४० ते ५० वयोगटातील लोकांना हृदयरोगासंदर्भातील आजार उद्भवत होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे २० ते २५ वयोगटातील व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. साईदीप हॉस्पिटलमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार केले जातात, याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले.

स्व. आदिकांचा वारसा जपणार
अनुराधा आदिक म्हणाल्या की, हृदयरोग तपासणी शिबिरामधून अनेकांना लाभ व्हावा ते बरे होऊन घरी जावे व तो आनंद कुटुंबाला मिळवा, अशी आमची माफक अपेक्षा आहे. स्व. आदिक यांनी सदैव समाजासाठी काम केले तोच वारसा आम्हीही पुढे चालवणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...