आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाला सुरुवात:विजांच्या कडकडाटांसह तासभर धो-धो बरसला ; नगरकरांची उडाली धांदल

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व परिसरात मंगळवारी साडेपाच वाजता मुसळधार पाऊस झाला. शहरात विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाचा देखावे पाहण्यासाठी अहमदनगर शहरात आलेल्या उपनगरातील नागरिकांना मोठा फटका बसला. शहर व परिसरात तासभरापेक्षा अधिक काळ या पावसाचा जोर कायम होता.अहमदनगर शहर व परिसरात गणेशोत्सवापासूनच पावसाला सुरुवात झाली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. नगर शहर व परिसरात साडेपाच वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर चाललेल्या पावसामुळे नागरिकांचेही मोठे हाल झाले.

गणेशोत्सवामुळे देखावे पाहण्यासाठी उपनगरासह शहरातील नागरिक पडले असतानाच मुसळधार पावसाने त्यांना झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील माळीवाडा, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचबरोबर उपनगरांमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवली. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तीच परिस्थिती शहरात देखील होती. शहर व परिसरातील भिंगार केडगाव सावेडी भागात विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला.

वाहतूक कोंडीचा फटका
मुसळधार पावसामुळे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता नगर-औरंगाबाद रस्त्यावरील डीएसपी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थिती कोठला व सक्कर चौकात देखील होती. शहरातील अंतर्गत भागातील वाहतूक कोंडी होती.

बातम्या आणखी आहेत...