आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यवाही:सानुग्रह अनुदान प्रलंबित प्रकरणांच्या‎ याद्या निकाली काढण्याचा झाला निर्णय‎

श्रीरामपूर‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना मृतांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या‎ ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची‎ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‎ ‎ तालुकानिहाय याद्या मागवण्याचा निर्णय ‎ ‎ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व‎ कोरोना एकल महिला पुनर्वसन‎ समितीच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी ‎ ‎ कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय ‎ ‎ घेण्यात आला.‎ कोरोना सानुग्रह अनुदान वाटप‎ प्रक्रियेच्या जिल्हा समन्वयक ‎ ‎ उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या ‎ ‎ प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.‎ यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.‎ संजय घोगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन‎ अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा‎ आरोग्याधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके,‎ मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. आनिल‎ बोरगे, जिल्हा महिला बाल विकास‎ अधिकारी बी. बी. वारुडकर, प्रशांत‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ गायकवाड, कोरोना एकल महिला‎ समितीचे अशोक कुटे, मिलिंदकुमार‎ साळवे, कारभारी गरड, प्रकाश इथापे,‎ बाळासाहेब जपे, दत्ता उरमुडे, भारत‎ आरगडे, रेणुका चौधरी, अप्पासाहेब‎ वाबळे आदी बैठकीस उपस्थित होते.‎ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार‎ कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५०‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप‎ करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या मदत‎ व पुनर्वसन विभागांतर्गत आपत्ती‎ व्यवस्थापन कक्षामार्फत राबवण्यात येत‎ आहे. परंतु ही प्रक्रिया राबविण्यात येत‎ असताना अर्ज भरल्यानंतरही अनेक‎ लाभार्थ्यांना तीन ते चार महिन्यांपासून‎ त्यांचे प्रस्ताव मंजूर होऊनही त्यांच्या बँक‎ खात्यात ५० हजार रुपयांचे सानुग्रह‎ अनुदान जमा झालेले नाही. काही‎ लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये ५० हजार‎ रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा झाल्याचे‎ संदेशही प्राप्त झाले. प्रत्यक्षात बँकेत‎ जाऊन पासबुक भरल्यानंतर व चौकशी‎ केल्यानंतर अशा प्रकारचे अनुदान बँकेत‎ संबंधित अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा‎ झालेच नसल्याचेही प्रकार नगर जिल्ह्यात‎ निदर्शनास आले. जिल्ह्यातील कोरोना‎ एकल महिला पुनर्वसन समिती तसेच‎ तालुकास्तरावरील मिशन वात्सल्य‎ समित्यांकडून ५० हजार रुपये सानुग्रह‎ अनुदान योजनेच्या प्रलंबित अर्जांच्या‎ याद्या मागवण्याचा निर्णय घेण्यात आला.‎ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या‎ याद्या प्राप्त झाल्यानंतर त्यांची पडताळणी‎ करून प्रलंबित अर्जांच्या मंजुरीबाबत व‎ अनुदान वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी‎ सोडवण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर‎ पाठपुरावा करण्यात येईल, असे‎ आश्वासन पल्लवी निर्मळ यांनी दिले.‎ प्रलंबित प्रकरणे मार्गी न लागल्यास उपोषण करू : साळवे‎ कोरोना एकल महिलांच्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या बाल‎ संगोपन योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली. त्यास‎ साडेचार महिने होऊन गेली असली तरी ही प्रकरणे जिल्हा बाल न्याय समितीसमोर‎ सह्यांसाठी न गेल्यामुळे अंतिम मंजुरी आदेश होऊ शकले नाहीत. त्यामुळे पात्र‎ बालकांना योजनेचा निधी साडेचार महिन्यांमध्ये मिळू शकला नाही. ही प्रकरणे‎ तत्काळ मार्गी न लागल्यास कोरोना एकल महिलांसह जिल्हा महिला व बालविकास‎ कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा श्रीरामपूरच्या मिशन वात्सल्य समितीचे‎ सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी या बैठकीत दिला. यावर जिल्हा महिला व‎ बालविकास अधिकारी बी. बी. वारूडकर यांनी आठवडाभरात ही सर्व प्रलंबित प्रकरणे‎ मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही वारुडकर यांनी यावेळी दिली.‎ प्रलंबित प्रकरणे मार्गी न लागल्यास उपोषण करू : साळवे‎ कोरोना एकल महिलांच्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या बाल‎ संगोपन योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली. त्यास‎ साडेचार महिने होऊन गेली असली तरी ही प्रकरणे जिल्हा बाल न्याय समितीसमोर‎ सह्यांसाठी न गेल्यामुळे अंतिम मंजुरी आदेश होऊ शकले नाहीत. त्यामुळे पात्र‎ बालकांना योजनेचा निधी साडेचार महिन्यांमध्ये मिळू शकला नाही. ही प्रकरणे‎ तत्काळ मार्गी न लागल्यास कोरोना एकल महिलांसह जिल्हा महिला व बालविकास‎ कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा श्रीरामपूरच्या मिशन वात्सल्य समितीचे‎ सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी या बैठकीत दिला. यावर जिल्हा महिला व‎ बालविकास अधिकारी बी. बी. वारूडकर यांनी आठवडाभरात ही सर्व प्रलंबित प्रकरणे‎ मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही वारुडकर यांनी यावेळी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...