आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:ते अपहरण नव्हते, तर अल्पवयीन‎ मुलानेच केला बेबनाव : ढीकले‎

श्रीगोंदे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे‎ तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी)‎ येथील पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन ‎मुलाचे अपहरण करून नेत आहेत.‎ याबाबत श्रीगोंदे पोलीस स्टेशनला गेली‎ दोन दिवसांपूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल ‎ ‎ झाला होता. मात्र पोलिसांनी सखोल‎ चौकशी केली असता अल्पवयीन मुलाने ‎ अतिशयोक्ती व चुकीची माहिती दिली ‎ ‎ असल्याचे स्थानिक चौकशी केली‎ असता अपहरण हे झालेच नाही, अशी ‎माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले‎ यांनी दिली.‎

अजनुज (आनंदवाडी) येथे दि. २८‎ सप्टेंबर रोजी शाळकरी मुलाला पळून‎ नेण्याच्या संशयावरून तसेच चाकू‎ दाखवून दमदाटी केल्याचे मुलाच्या‎ सांगण्यावरून ग्रामस्थांनी नासिर गुलाब‎ पठाण व हरिभाऊ दत्तू वाळुंज या दोन‎ तरुणांना मारहाण करत पोलिसांच्या‎ ताब्यात दिले होते. याप्रकरणी अल्पवयीन‎ मुलाच्या वडिलांनी या दोघांच्या विरोधात‎ पोलीस स्टेशनला फिर्यादही दाखल केली.‎ मारहाण केल्याप्रकरणी व गाडीची‎ तोडफोड केल्याप्रकरणी पाच ते सहा‎ ‎जणांच्या विरोधात गाडी चालकाने देखील‎ विरोधी फिर्याद दाखल केली आहे.‎ मात्र या अपहरण प्रकरणाचे पोलिसांनी‎ तपास करत असताना स्थानिक व्यक्तींनी‎ सांगितले, त्या मुलाचे अपहरण केले‎ नव्हते तर तो मुलगा स्वतः होऊन त्या‎ गाडीत बसला होता. तसेच त्यास चाकू‎ देखील दाखवला नव्हता.

तुझी किडनी‎ काढून घेऊ असे देखील वक्तव्य कोणी‎ केले नव्हते. या बाबी तपासात उघड‎ झाल्या असून त्या मुलाने चुकीची माहिती‎ सांगितले आहे. अपहरणाची घटना‎ घडलीच नाही. नागरिकांनी सतर्क राहून‎ संशयित व्यक्ती आढळून आल्यास‎ ‎पोलीस ठाण्याशी संपर्क करावा मात्र‎ कायदा हातात घेऊ नये, अन्यथा‎ कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही‎ ढिकले यांनी म्हटले आहे.‎ यातील आरोपीच्या विरोधात गाडीमध्ये‎ विनापरवाना महाराष्ट्र शासन नावाची‎ पाटी आढळून आल्याने शासनाची‎ फसवणूक केल्याप्रकरणी आणि मुंबई‎ दारूबंदी अधिनियमनुसार व मोटार‎ अधिनियम दारू पिऊन वाहन चालवणे‎ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या‎ गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रामराव‎ ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस‎ उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...