आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादर्जेदार आणि उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडवत त्यांना आयुष्यामध्ये संस्कारक्षम आणि यशस्वी बनवण्यासाठी परिश्रम घेणारे ''साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल'' भविष्यामध्ये संस्कार मंदिर म्हणूनच नावारूपाला येईल, असा विश्वास प्रख्यात लेखक व विचारवंत रवींद्र तथा राजाभाऊ मुळे यांनी व्यक्त केला.
साई एंजल्सच्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य विश्वस्त डॉ. राकेश गांधी होते. संस्थेचे विश्वस्त विजय निकम, दैनिक दिव्य मराठीचे ब्युराे चिफ अनिरुध्द देवचक्के, किशोर निर्मळ, लताताई करपे, अमित कोठारी, श्वेता कोठारी, डॉ. प्रियन जुनागडे, डॉ. रोहित फुलवर, डॉ. संकेत सारडा, डॉ. सुनील आवारे, डॉ. विनायक शिंदे, डॉ. प्रितेष कटारिया, डॉ. योगेश बाफना, सीए नितेश गुगळे, अभय कटारिया, सुशील जैन, महेश भळगट, शामली भांगे, योगेश बेल्हेकर आदी उपस्थित होते.
अनिरुध्द देवचक्के म्हणाले, वेगाने विकसित होणाऱ्या नव्या अत्याधुनिक जगात माणसाच्या जगण्याच्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत. या नव्या जगाशी अनुरूप असे सर्वांगीण शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण विकास करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवूनच साई एंजल्सची वाटचाल सुरू आहे. मुलांसाठी शिक्षण आनंददायी ठरावे आणि पालकांनाही त्यांचे आनंददायी पालकत्व समाधानाने निभावता यावं, यासाठीच नव्या व्यवस्थापनाकडून पुढील शैक्षणिक वर्षांत विविध उपक्रम हाती घेतले जातील. त्यातून एक प्रगत आणि आश्वासक पिढी आकाराला येईल.
गुणदर्शनच्या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला दर्शनाच्या कार्यक्रमाला पालकांनी दाद दिली. डॉ. राकेश गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अहवाल वाचन प्राचार्य नॅन्सी कोल यांनी, सूत्रसंचालन ॲड. गणेश शेंडगे यांनी , तर आभार डॉ. आशिष भंडारी यांनी मानले.
साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन करताना राजाभाऊ मुळे. समवेत डॉ. राकेश गांधी, विजय निकम, अनिरुद्ध देवचक्के, किशोर निर्मळ, लताताई कर्पे, अमित कोठारी, शिल्पा कोठारी, डॉ. प्रियन जुनागडे आदी. छाया : समीर मन्यार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.