आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"वारकरी संप्रदायाचा ‘ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासी कळस..’ जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंग व गाथेचा अनमोल व अमृतरुपी ठेवा दिला आहे. या अमृतरुपी अभंग व तुकाराम महाराजांची गाथा तंतोतंत लेखन करुन जगासमोर आणण्याचे महान कार्य राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केले आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक बुवा महाराज मोरे यांनी केले. शहरातील आडते बाजार येथील तेली पंचाचा वाडा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जगद्गुरू संत तुकोबाराय यांचे दहावे वंशज, देहू देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दिंडीप्रमुख माणिक बुवा महाराज मोरे यांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सदिच्छा भेट देऊन महाआरती केली व मार्गदर्शन केले. याप्रसंगी माणिक बुवा महाराज मोरे यांचे संतपूजन हरिभाऊ डोळसे व मीरा डोळसे यांनी केले.
याप्रसंगी पुरुषोत्तम मोरे महाराज, शिवराज मोरे, विश्व हिंदू परिषदेचे रत्नागिरी जिल्हा मंत्री वल्लभ केनवडेकर, विश्व हिंदू परिषदेचे नगर जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, मठ मंदिर समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे, क्षीरसागर महाराज, निवृत्ती महाराज घोडके, डॉ. चंद्रकांत केवळ, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक भारत थोरात, निमगाव वाघा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कानिफनाथ मानूरकर, बाळासाहेब वालझाडे, किरण येवलेकर, श्रीराम हजारे, नीलेश चिपाडे, देविदास साळुंखे, अशोक जोशी, गणेश पलंगे, बाली जोशी, प्रमोद वाळके, जब्बर शेख, सुरेंद्र सोनवणे, काशीनाथ गाडेकर, सुरेश देवकर, माधवराव ढवळे, अरुण ढवळे,चेतन डोळसे, प्रकाश कोडम, बबनराव मानुरकर, मनोज नागवी, मीरा डोळसे आदी उपस्थित होते.
तुकाराम महाराजांचे दर्शन झाल्याची भावना
हरिभाऊ डोळसे म्हणाले, “संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक बुवा महाराज मोरे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सदिच्छा भेट दिली. आम्हाला संतपूजनाचे भाग्य लाभले. जगद्गुरु तुकोबाराय व राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांचे गुरू-शिष्याचे नाते होते. आज मोरे महाराजांच्या रूपाने संत तुकाराम महाराजांचे दर्शन झाले.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.