आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार विजयी:मांडे-मोरगव्हाण सोसायटी निवडणुकीत जय हनुमान पॅनलचा 7 जागांवर विजय

सोनईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मांडेगव्हाण व मोरगव्हाण या दोन्ही गावच्या संयुक्त सोयासायटीच्या झालेल्या निवडणुकीत जय हनुमान पॅनलने यशवंत पॅनल विरुद्ध बाजी मारत 12 पैकी 7 जागांवर विजय प्राप्त केला.

विशेष म्हणजे सोसायटी स्थापनेपासून प्रथमच निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये दोन्हीही पॅनल कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरले होते. या निवडणुकीत १ जागा यशवंत पॅनलेला बिनविरोध मिळाली होती, तर उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी सरपंच बबनराव बाराहाते यांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान सहकार पॅनल, तर माजी चेअरमन अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत शेतकरी पॅनलने परस्परविरोधी दंड थोपटले.

सदर निवडणुकीत जय हनुमान पॅनलला ७, तर यशवंत पॅनलला ५ जागा मिळाल्या. चुरशीच्या निवडणुकीत परस्पर विरोधी गटाने एकमेकांवर आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या. निवडणुकीच्या दिवशी बाचाबाची वगळता तणावपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. एकूण २४३ मतदान झाल्याने संध्याकाळी निकाल बाहेर आल्याने गर्दीमध्ये एकच जल्लोष झाला. कारण ज्या विशेष मागास प्रवर्गाच्या निवडणुकीत ३०-३५ वर्षांपासून राजकारणात महत्वाची पदे उपभोगणाऱ्या अप्पासाहेब शिंदे व उद्धवराव शिंदे यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. त्या प्रवर्गात शिंदे व सोनवणे यांना समसमान मते मिळून चिठ्ठीने उद्धवराव सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत भटक्या विमुक्त प्रवर्गातून गणपत पालवे, महिला प्रवर्गातून तीनही महिलांना समसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे प्रत्येकी दोन्ही पॅनलच्या एक उमेदवार अनुक्रमे रेखा पोपट सोनवणे व रुपाली अनिल सुरुसे यांना विजयी घोषित करण्यात आले.

सर्वसाधारण कर्जदार प्रवर्गातून बबनराव बाराहाते, बाबासाहेब सोनवणे, मल्हारी शिंदे व शेषराव शिंदे हे जय हनुमान सहकार पॅनलकडून, तर गोरक्ष सोनवणे, दिलीप सोनवणे, रोहिदास सोनवणे व कचरू सुरुसे हे यशवंत पॅनलकडून विजयी घोषित करण्यात आले.