आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय हिंद:ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देण्याची ‘जय हिंद’ ची मागणी

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्यात शिक्षक मतदार संघाप्रमाणे सात विभागांमध्ये सात सैनिक मतदार संघ निर्माण करून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा व राज्यसभेत प्रत्येकी एक जागा देऊन माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

नुकतेच फाउंडेशनच्या वतीने पंतप्रधान यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री, रक्षा मंत्री व केंद्रीय निवडणूक आयोग यांना निवेदन पाठवण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली. देशामध्ये सैनिकांना राजकीय आरक्षण मिळाल्यास मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो. देश सेवा केलेले माजी सैनिक देशाच्या विकासासाठी आपले योगदान देणार आहेत. आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात आणि केंद्रामध्ये सैनिक प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. सैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सैनिक देशाच्या सीमेवर रक्षण करत असताना सैनिकांच्या जमिनीवर अवैध कब्जा केला जातो. सैनिकांचे शेतीतील रस्ते बंद करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही. राज्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सात आमदार आहेत. मात्र, आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राजकीय आरक्षण मिळण्याची मागणी केली अाहे.