आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायपीट:जलजीवन मिशन मुळे महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गावागावात शुद्ध पाणी मिळाले पाहिजे ग्रामीण भागातील महिलांचा डोक्यावरील हंडा उतरला पाहिजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना राबवली. ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे, असे प्रतिपादन माजी अामदार शिवाजी कर्डिले यांनी केले. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एमआयडीसी ते अरणगाव (मेहराबाद) येथे पंधरा कोटी ५९ लाख ७८ हजार ४५० रुपये कामाचे भूमिपूजन कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी हाउसिंग सोसायटीचे चेअरमन किसनराव लोटके, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, संतोष मस्के, दीपक कारले, पोपटराव पुंड, मेहरनाथ कलचुरी, रमेश जंगले आदी उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, भौगोलिक परिस्थिती पाहता नगर तालुका हा दुष्काळी भाग आहे. पाऊस संपल्यानंतर पाण्याचे हाल होतात. १९९५ मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बुरहानकर आणि ४४ गा वात प्रादेशिक पाणी योजना राबवली. यामुळे बुरहानकर आणि गावाचा विकास झाला. शहरापासून अरणगाव जवळ आहे. परंतु पाणी नसल्यामुळे विकास खुंटला आहे आता लवकरात लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे गावचा विकास होईल. प्रास्ताविक बबन करांडे यांनी केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले, जलजीवन मिशन मुळे अरणगावचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शहराच्या जवळ असलेले हे गाव पाणी नसल्यामुळे विकासापासून वंचित होते. परंतु आता जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

बातम्या आणखी आहेत...