आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:जामखेड जलयुक्त शिवार घोटाळा; दोघांना अटक

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे वन विभागामार्फत झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामात ४० हजारांचा अपहार झाल्याचे लाचलुचपत विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात वन विभागाच्या तत्कालीन तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी फिर्याद दिली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

रमेश गोविंद गोलेकर (६३, तत्कालीन सहायक वन संरक्षक), संतोष आनंदा बोराडे (६२ वर्ष, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी), महादेव भिमा राठोड (५५, तत्कालीन वनपाल, सध्या नेमणूक- सामाजिक वनीकरण, शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. बोराडे व राठोड यांना अटक करण्यात आली आहे. डिसेंबर २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान हा गैरव्यवहार झाला आहे.

महाराष्ट्र शासनाकडून जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामांची उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले होते. त्यामध्ये अरणगाव (ता. जामखेड) येथील गट नंबर २९४ मधील चर खोदण्याचे काम वनविभागामार्फत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...