आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Janshakti Will Contest All The Seats In The Forthcoming Elections, Adv. Shivajirao Kakade's Information, Jija Patkal And Dhakne's Entry Into Manpower | Marathi News

राजकारण:अगामी निवडणुकीत जनशक्ती सर्व जागा लढवणार, ॲड. शिवाजीराव काकडे यांची माहिती, जिजा पातकळ व ढाकणे यांचा जनशक्तीत प्रवेश

शेवगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जनशक्ती ताकतीनिशी सर्व जागा लढवणार असल्याचे प्रतिपादन अॅड. शिवाजीराव काकडे यांनी केले. जनशक्ती विकास आघाडी कार्यकर्त्यांची बैठक शेवगाव येथे मंगळवारी घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महासचिव जगन्नाथ गावडे, हर्षदा काकडे, देवराव दारकुंडे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, शिवाजी औटी, कॉम्रेड राम पोटफोडे, रामजी मडके, ज्ञानेश्वर फसले, रवींद्र कणके, अकबर भाई शेख. विश्वास ढाकणे, अमोल म्हस्के, भागवत रासनकर, शामराव खरात, लक्ष्मण पातकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चापडगावचे माजी चेअरमन राजू ऊर्फ जिजा पातकळ व लखमापुरीचे माजी सरपंच अशोक ढाकणे यांनी जनशक्ती विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. ॲड. काकडे म्हणाले, आता तालुक्यात गाव तिथे शाखा उपक्रम राबवणार आहोत. सर्वसामान्यांची आज विविध प्रश्नावरून अडवणूक होत आहे. ही गैरसोय दूर करण्याचे काम जनशक्तीचे कार्यकर्ते करणार आहेत. जनशक्तीच्या वतीने कार्यकर्त्यांना घडवण्याचे व जनशक्तीचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक शिबीर लवकरच आयोजित करणार आहोत. तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न समजून उमजून ते कसे पूर्ण करता येतील व त्यांना न्याय देता येईल हेच ध्येय येणाऱ्या काळात असेल.

बातम्या आणखी आहेत...