आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील रुईखेल येथील ग्रामदैवत जानुबाईची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पैठणहून आणलेल्या कावडीची सकाळी ८ वाजता गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अन् डीजेच्या तालावर आबालवृद्धांनी ठेका धरला. त्यानंतर मंदिरात कावडी आणल्यावर तेथे देवीची आरती करण्यात आली.
आरतीनंतर उपस्थित ग्रामस्थांना कारभारी गरड, अशोक गरड व संपत गरड यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध दुकाने थाटली होती. लहानग्या चिमुकल्यांनी पाळण्यात बसण्याचा आनंद लूटला. कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले अनेक जण यात्रेनिमित्त गावी आले होते.
जुन्या मित्रांच्या भेटी झाल्यावर अनेक जण आठवणींमध्ये रमून गेले. जानूबाई देवीच्या दर्शनासाठी परिसरातील गावांतून मोठ्या संख्येने भाविक येत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. दुपारी २ ते रात्री आठ वाजेपर्यंत देवीच्या सवाष्णी व रात्री देवीची पालखी निघाली. रात्री ९ वाजता अवघ्या ९ वर्षांचा बालकीर्तनकार माऊली महाराज जाहुरकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर आराद्याची गाणे व अन्य पारंपरिक कार्यक्रम झाले. यात्रेचे नियोजन सुरेश महाडीक, सुभाष काळोखे, दत्तात्रेय जगदाळे, दादासाहेब काळोखे, उपसरपंच आजिनाथ नागवडे, संजय महांडुळे, सिद्धेश्वर काळोखे, नानाभाऊ काळोखे, धनंजय काळोखे व शिवक्रांती ग्रूप आदींनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.