आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर:जरे कुटुंबाला हवे संरक्षण; फरार बोठेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा भाऊसाहेब जरे यांचा मुलगा रुणाल याने पोलिस अधीक्षकांना निवेदन देत पत्रकार बाळ बोठे हाच आपल्या आईच्या हत्येचा सूत्रधार असून त्याच्यापासून आपल्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याने पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बोठे याचे आमच्या घरी येणे-जाणे होते. माझ्या आईचा त्याने अनेकदा मानसिक व शारीरिक छळ केला. तुला किंवा तुझ्या मुलांना ठार करेन, अशी धमकी तो द्यायचा. त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कोणी त्याच्या विरोधात बोलत नव्हतो. पूर्वी माझ्या आईने त्याच्याविरोधात पोलिसांत अर्ज दिले होते. आईच्या खून प्रकरणातील आरोपींनी खुनाची कबुली दिली असून सूत्रधार बोठे असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, फरार आरोपी बोठे याच्या वतीने सोमवारी दुपारी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दोन आरोपींना न्यायालयीन, तर तिघांना ९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser