आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे सरकारबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य:म्हणाले- शिर्डी अधिवेशनानंतर सरकार कोसळणार, मध्यावधी निवडणुका केव्हाही लागतील

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यवधी निवडणुका केव्हाही लागु शकतात, त्यासाठी आमची तयारी आहे. आम्ही शिर्डीत जाऊन स्नेही खासदार सुजय विखे यांना सांगणार आहोत की, एक अधिवेशन झाले होते तेव्हा सरकार पडले होते. आता आमचे शिर्डीतील अधिवेशन झाल्यानंतरही सरकार पडेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

शिर्डीत राज्यव्यापी अधिवेशन

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ४ ते ५ नोव्हेंबरला शिर्डी येथे राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा, हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी आजी माजी आमदार, खासदार तसेच जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. त्यात विचारवंतांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

शिंदे गटाबद्दल वक्तव्य

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातला पक्ष आहे, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आव्हानात्मक नाहीत. आगामी निवडणुकीत शक्यतो महाविकास आघाडीचाच प्रयत्न राहील. शिंदे गटाचे कोणी आमच्या संपर्कात नाही, पण त्यांच्या भावना त्यांनी आमच्याकडे पोहोचवल्या आहेत.

भाजप त्यांना नारळ देईल

जयंत पाटील म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार झाला की ते दाखवून देतील. त्यांच्या गटातील नऊ ते दहा लोक विस्तारापर्यंत थांबतील, पण एवढा संयम त्यांनी बाळगला याचे कौतूक आहे. मध्यावधी निवडणुका लागतील असे वाटते, त्यासाठी आम्ही तयार आहोत. भाजपने टोळीबरोबर आघाडी केली. ही आघाडी फक्त एका गटासोबत आहे, पक्षाबरोबर नाही. त्यांचा उपयोग संपला की भाजप त्यांना नारळ देईल, त्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी भक्कम

खासदार सुजय विखे यांनी, काँग्रेसचे अधीवेशन झाले त्यावेळी सरकार पडले होते, आता राष्ट्रवादीचे अधीवेशन झाल्यानंतर त्यांचा पक्ष फुटेल अशी टिका केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पाटील म्हणाले, विखे यांनीच तिथला पायगूण सांगितला याचे कौतुक वाटते. पण आम्ही शिर्डीला येऊन सांगणार आहोत. एका अधीवेशनानंतर यापूर्वी सरकार पडले होते. आता आमच्या अधीवेशनानंतरही सरकार पडणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम पक्ष असून फुटण्याचा प्रश्नच नाही.

बातम्या आणखी आहेत...