आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी गोविंदगिरी महाराज यांना 'जीवन गौरव पुरस्कार':ते अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्षही; अहमदनगरमध्ये 16 सप्टेंबरला वितरण

अहमदनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरच्या आनंदोत्सव चारिटेबल ट्रस्टच्या वतीने यंदा अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र व अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुराच्या श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष विद्यावाचस्पती स्वामी गोविंदगिरी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांना 2021 या वर्षीचा 'जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (16 सप्टेंबर) सायंकाळी साडेचार वाजता अहमदनगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात होणार आहे. अशी माहिती रविवारी आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली.

यंदा अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुराच्या श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष विद्यावाचस्पती स्वामी गोविंदगिरी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांनी अहमदनगरमधून आपल्या अध्यात्मिक कार्यास सुरवात करून आज ते राष्ट्रहितासाठी भरीव योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना राष्ट्रीय स्तरावरील जीवन गौरव पुरस्कार देत आहोत. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर योगदान देणाऱ्या 11 दिग्गज व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा 12 वा पुरस्कार वितरण समारंभ आहे, अशी माहिती रविवारी आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली.

स्वागताध्यक्ष अ‌ॅड.के. डी. धुमाळ यांनी सांगितले, अमृतवाहिनी प्रवरा मातेचे सुपुत्र व संतकवी राष्ट्रप्रबोधक स्वामी गोविंदगिरी महाराज यांना राज्यातील महान संत मंडळांच्या हस्ते हा 'जीवन गौरव पुरस्कार' देण्यात येणार आहे. देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर, नाशिकचे जगद्गुरु ज्ञानोबा-तुकोबा द्वाराचार्य व विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज, श्रीरामपुरच्या सरला बेटचे महंत ह.भ.प. रामगिरी महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज व देहूच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज, संत समर्थ रामदास स्वामींचे 11 वे वंशज व सज्जनगड श्री रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष महंत भूषण स्वामी व वसई पालघर येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आदी संत विभूतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

या समारंभास विशेष अतिथी म्हणून गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी उपस्थित राहणर आहेत. तसेच पुण्याच्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा.प्रकाश सोमण, मोरया प्रकाशाचे प्रमुख दिलीप महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...