आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाखाचा ऐवज चोरीला:खर्डा बसस्थानकातून प्रवाशांचे दागिने लांबवले

खर्डा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संत सीताराम बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त गडावर सप्ताह आयोजित केला होता. महाप्रसाद व बाबांच्या दर्शनासाठी सीताराम गडावर भक्तांची मांदियाळी होती. खर्डा व परिसरातून मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी आले होते. बस स्थानकात मोठी गर्दी झाल्याने या गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले. या वेगवेगळ्या घटनेत एक लाखाचा ऐवज लंपास केल्याची तक्रार खर्डा पोलीस स्टेशनला दिली आहे.

सीताराम बाबा यांच्या अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसाद यासाठी हजारो भाविक येथे येतात. प्रत्येक वेळी जामखेड आगराकडून जादा गाड्या सोडल्या जात होत्या. परंतु यावेळी एकही जादा गाडी,लोकल गाडी न सोडल्याने भाविक नाराज झाले आहेत. बस स्थानकात प्रचंड गर्दी झाल्यानेच दोन प्रवाशांना लाख रुपयाचे दागिने गमवावे लागले. यात फिर्यादी पूनम पाटील, रा. माणकेश्वर, ता.भूम या महिलेच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र,चार ग्रॅम कानातील झुमके, पाच ग्रॅम हातातील अंगठी, दहा ग्रॅम गळ्यातील सोन साखळी चाेरट्यांनी लांबवली. दुसऱ्या घटनेत मालन तागड, वय ७०, रा. दिघोळ,यांचे गळयातील मंगळसूत्र, डोरले चोरट्याने चोरून नेले.

बातम्या आणखी आहेत...