आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:1 लाख 40 हजार रुपयांचे‎ दागिने फिर्यादीस केले परत‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपहरण करून २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून‎ नेल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल‎ गुन्ह्याचा तपास करत दागिने हस्तगत करून फिर्यादीला‎ परत देण्यात आले. नगर तालुका पोलिसांनी ही कामगिरी‎ केली. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी तुकाराम शिवाजी‎ भापकर याला अटक केली होती. त्याने गुन्ह्यातील‎ मुद्देमाल रत्नसुंदर अर्बन को ऑप.

सोसायटी‎ (माजलगाव जि.बीड) येथे दिल्याचे पोलिसांना‎ सांगितले. नगर तालुका पोलिसांनी तेते जाऊन मुद्देमाल‎ ताब्यात घेत जप्त केला. न्यायालयाची परवानगी घेऊन‎ फिर्यादीला हस्तगत केलेले सोन्याचे दागिने परत देण्यात‎ आले. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक‎ प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित‎ पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या‎ मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...