आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मोर्चा:झारखंड सरकारच्या निर्णयाचा जैन समाजाकडून निषेध ; समाज बांधवांनी पाळला बंद

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील श्री सम्मेद शिखरजी जैन तीर्थक्षेत्रास झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिल्याच्या निर्णयाचा बुधवारी जिल्हाभरातील जैन समाज बांधवांनी जोरदार निषेध केला. नगर शहरासह जिल्हाभरात जैन समाजातील व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. जैन व्यावसायिकांच्या या बंदला पाठिंबा म्हणून अन्य धर्मिय व्यावसायिकही या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दरम्यान, सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राचा पवित्र दर्जा कायम राहावा, यासाठी सकल जैन समाजातर्फे नगर शहरातून मोर्चा काढण्यात आला होता.

कापड बाजार, मार्केट यार्ड, नवी पेठ, चितळे रस्ता तसेच सावेडी, केडगाव, भिंगार परिसरातील जैन व्यावसायिकांची दुकाने बंद होती. आडते बाजार, डाळ मंडई, मार्केट यार्ड येथील घाऊक व किरकोळ आडते व्यापार्‍यांनी कोणत्याही प्रकारची उतराई-भराई केली नाही. जिल्ह्यातही श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, लोणी, आश्‍वी, कोल्हार, राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदे, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, नेवासे, राहाता, अकोले अशा सर्वच भागात जैन व्यावसायिकांनी बंद पाळला. याशिवाय समाजातील व्यावसायिकांनी आपापली आस्थापने व दुकाने बंद ठेवून झारखंड सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला.

कापड बाजारातून झारखंड सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. जैन धर्म महान है.. सम्मेद शिखरजी हमारी शान है.. अशा घोषणा मोर्चात देण्यात आल्या. झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...