आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्या:जिल्हा परिषदेत तब्बल 228 कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या‎, विनंती बदल्यांना‎ मिळाले नकार‎

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‎ जिल्हा परिषदेत प्रशासकीय व‎ विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण‎ झाली आहे. तीन दिवसांत तब्बल‎ २२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या‎ आहेत. अपेक्षीत ठिकाणी जागा न‎ मिळाल्याने अनेकांनी विनंती‎ बदल्यांत नकार दिला.‎

जिल्हा परिषदेत सर्वसाधारण‎ बदली प्रक्रियेत सवलत असलेल्या‎ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र,‎ वैद्यकीय प्रमाणपत्र आदीची‎ पडताळणी जिल्हा परिषदेच्या‎ वैद्यकीय पथकामार्फत करण्यात‎ आली. तसेच सादर केलेले‎ प्रमाणपत्र चुकीचे आढळल्यास‎ कारवाईची तंबी मुख्य कार्यकारी‎ अधिकारी आशीष येरेकर यांनी‎ दिली होती. या बदलीप्रक्रियेकडे‎ जिल्हा परिषदेच्या सुमारे तीन‎ हजार कर्मचाऱ्यांचे लक्ष होते.‎

प्रमाणपत्रांची पडताळणी

महिला‎ बालकल्याण विभागातील ८, पशु‎ संवर्धन १४, लघुपाटबंधारे १,‎ ग्रामीण पाणीपुरवठा १, बांधकाम‎ ९, आरोग्य ५२, ग्रामपंचायत ५९‎ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी‎ १६, विस्तार २, शिक्षण‎ विभागातील १६, सामान्य‎ प्रशासनातील ४३, अर्थ‎ विभागातील ६ तर कृषी‎ विभागातील १ कर्मचाऱ्याची बदली‎ झाली. या बदली प्रक्रियेच्या‎ पहिल्याच दिवशी एका‎ कर्मचाऱ्याच्या प्रमाणपत्राबाबत‎ संशय आल्याने पडताळणी‎ करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने‎ घेतला.‎

एकूण २२८‎ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

बदली प्रक्रियेत मुख्यालयी‎ पसंती असलेल्या बहुतेक‎ कर्मचाऱ्यांकडून बांधकाम,‎ लघुपाटबंधारे विभागाला पसंती‎ होती, तर राहुरी पंचायत‎ समितीसाठी अनेकांनी विनंती‎ केली. आतापर्यंत एकूण २२८‎ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या‎ आहेत. शुक्रवारी जिल्हा‎ परिषदेच्या आरोग्य विभागात‎ आरोग्यसेवक महिलांच्या १६‎ प्रशासकीय तर १५ विनंती व ७‎ आपसी बदल्या झाल्या. औषध‎ निर्माण अधिकारी पदाच्या १४‎ बदल्या झाल्याची माहिती जिल्हा‎ परिषद प्रशासनाने दिली.‎