आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधान डाकघर सहायक अधीक्षकपदी संतोष जोशी यांची नियुक्ती झाली. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. हे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त होते.
जोशी यांनी आपल्या डाकसेवेस अहमदनगर विभागातील पाथर्डी पोस्ट ऑफिस मधून डाक सहायक या पदापासून प्रारंभ केला. त्यानंतर ते श्रीरामपुर विभागात अकोले येथे कार्यरत असताना ते खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होत ते इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट यापदी त्याची निवड झाली. डाक निरीक्षक म्हणून खेड (पुणे) व कोपरगाव उपविभाग येथे काम पाहिले. जोशी यांनी आपला कार्यभार स्वीकारल्यानंतर नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्य उपाध्यक्ष व अहमदनगर विभागाचे ज्येष्ठ नेते संतोष यादव यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप कोकाटे, नामदेव डेंगळे, तान्हाजी सूर्यवंशी, सुनील थोरात, विजय दरंदले, भाऊसाहेब जाधव, नितीन खेडकर, झुंबरराव विधाते, सागर पंचारिया, अर्चना भुजबळ, निलिमा कुलकर्णी, रंजना कडम उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.