आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वस्त मंडळाची प्रक्रिया निवडणूक:यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या अध्यक्षपदी जोशी

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था अहमदनगर या संस्थेच्या सन २०२२ ते २७ या पंचवार्षिक कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी दिनकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या निवडणुकीत एकूण ११ सदस्य बिनविरोध निवडून आले. यात सर्वश्री आदिनाथ भगवान जोशी, रत्नाकर मारुतराव कुलकर्णी, विलास नारायण बडवे, मोरेश्वर मोहनीराज मुळे, सुधीर श्रीधर पाठक, रमेश अनंत देशपांडे, नंदकुमार मधुसुदन निसळ, विजया चंद्रकांत रेखे या पूर्वीच्या विश्वस्तांबरोबर सर्वश्री नंदकुमार दत्तात्रय कुलकर्णी, दत्तात्रय सुधाकर जोशी आणि किरण सुधाकर वैकर यांची विश्वस्त म्हणून निवड झाली. नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाच्या सभेत आदिनाथ भगवान जोशी यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - उपाध्यक्ष- रत्नाकर कुलकर्णी, सचिव- विलास बडवे, सहसचिव - मोरेश्वर मुळे, खजिनदार - सुधीर पाठक यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या वतीने सर्व शाखीय ब्राह्मण वधू-वर सुचक केंद्र चालवण्यात येत आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच संस्थेची स्वतःच्या मालकीची जागा चौपाटी कारंजा येथे असून तेथे लवकरच यजुर्वेदभवनाची निर्मिती करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...