आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडास्पर्धांचे उद्घाटन:न्यायाधीश व वकील रमले क्रीडा स्पर्धांमध्ये‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर वकील संघटनेच्या वतीने‎ वकील, न्यायाधीश व न्यायालयीन‎ कर्मचाऱ्यांसाठी वाडियापार्कच्या‎ मैदानावर विवध क्रीडा स्पर्धांचे‎ आयोजन केले होते. जिल्हा प्रधान‎ व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा‎ यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित‎ करून व हवेत फुगे सोडून‎ क्रीडास्पर्धांचे उद्घाटन झाले.‎ यावेळी वय वर्ष ४५च्या आतील व‎ ४५ च्या वरील दोन गटांत क्रिकेट,‎ जलतरण, बॅडमिंटन, बुद्धिबळ, १०० व‎ ४०० मीटर धावणे, गोळा फेक,‎ रस्सीखेच व दोरी वरच्या उड्या या‎ मैदानी खेळांचे आयोजन करण्यात‎ आले होते.

न्या‎ याधीश सुधाकर यार्लगड्डा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांच्यासह सर्व न्याधीशांनी व वरिष्ठ व‎ कनिष्ठ वकिलांनी खेळांमध्ये सहभगी‎ होत आनंद लुटला. वकील संघटनेचे‎ अध्यक्ष अॅड. संजय पाटील, उपाध्यक्ष‎ राजाभाऊ शिर्के, सचिव गौरव दांगट,‎ अभय राजे यांनी स्पर्धेचे संयोजन‎ केले. यावेळी जिल्हा प्रधान व सत्र‎ न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा म्हणाले,‎ दैनदिन जीवनात ताणतणावाचे प्रमाण‎ खूप वाढत आहेत. न्यायाधीश व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वकील वर्ग कायम ताणतणावातच‎ काम करत असतात. त्यातून थोडीशी‎ मोकळीक मिळावी यासाठी‎ क्रीडास्पर्धांचे आयोजन करून‎ वकील संघाने उपयुक्त उपक्रमचे‎ आयोजन केले आहे.

सर्व वकील व‎ न्यायाधीशांना क्रीडास्पर्धांचा‎ मनमुराद आनंद घेता आला आहे.‎ प्रास्ताविकात अध्यक्ष संजय‎ पाटील म्हणाले, शहर वकील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संघटना न्यायाधीश व वकिलांसाठी‎ दरवर्षी क्रीडास्पर्धांचे आयोजन‎ करत आहे. करोना संकटामुळे दोन‎ वर्षांनी या स्पर्धा होत आहेत. सर्व‎ क्रीडा स्पर्धेमध्ये महिला व पुरुष‎ न्यायाधीश, वकील व न्यायालयीन‎ कर्मचारी उत्साहात सहभागी झाले.‎ सूत्रसंचालन राजाभाऊ शिर्के यांनी,‎ तर आभार सचिव गौरव दांगट यांनी‎ मानले.‎

वकील संघटनेच्या‎ क्रीडास्पर्धा उत्साहात‎ वकील, न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या क्रीडास्पर्धांचे जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा‎ यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन केले.‎

बातम्या आणखी आहेत...