आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोवार्ता:उंचखडक खुर्द येथील ज्योती राक्षे हिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पदवीधर शिक्षण घेतले

अकोले4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उंचखडक खुर्द, ता. अकोले येथील ज्योती बाळासाहेब राक्षे हिची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पदवीधर शिक्षण घेतलेली अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी व वारकरी संप्रदाय पुरस्कर्ते बाळासाहेब राक्षे यांची ज्योती कन्या व अगस्ती साखर कारखान्यात शेतकी मदतनीस म्हणून काम करीत असलेले धोंडिभाऊ राक्षे यांची पुतणी आहे. ज्योतीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचखडक खुर्द येथे व माध्यमिक शिक्षण श्रीसंत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी व पदवीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातील अगस्ती महाविद्यालयात झाले. पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तिने वक्तृत्व, वादविवाद व इतर स्पर्धासह खेळात सहभाग नोंदविला. यातूनच तिने जिल्हा व राज्य स्तरावर सुवर्णपदक व विविध पारितोषिके पटकावली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१९ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात एम ए केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करून तिने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण होऊन तिची निवड झाली. यापूर्वीही उंचखडक खुर्द येथील कन्या सौ. मनिषा उल्हास वैद्य हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. त्यानंतर ज्योती हिने उंचखडक खुर्द गावातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...