आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर सत्कार:काका कोयटे यांचा कोपरगाव तालुक्यातील विविध संघटनांतर्फे सत्कार

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समता पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, समता चॅरिटेबल ट्रस्ट, व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन, या माझ्या मूळ संस्था असून या संस्थांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पदावरून सहकार चळवळीला बळकट करण्याचे काम करत आहे त्यातूनच परदेशी दौरे करून नवनवीन तंत्रज्ञान भारतातील पतसंस्थामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे.

कार्याची दखल घेऊन बँकॉक येथे झालेल्या आशियाई पतसंस्था फेडरेशन (ॲक्यु) च्या ४१ व्या जनरल बैठकीत लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन संचालक म्हणून माझी निवड झाली तर खजिनदार पदी निवड करण्यात आली.या पेक्षा ही माझ्यासाठी मी भारत देशाचे प्रतिनिधित्व केले ही सर्वात अभिमानाची गोष्ट होती, असे मत आशियाई पतसंस्था फेडरेशन (ॲक्यु) वर संचालक व बहुमताने खजिनदारपदी निवड झालेले ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले. विविध संघटनांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...