आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर तालुक्यातील आगडगाव येथे काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (१६ नोव्हेंबर) रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा होणार आहे. या दिवशी दिवसभर महाप्रसाद सुरू राहणार असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. काळ भैरवनाथांच्या दर्शनासाठी भैरवनाथ जन्मोत्सव ही वर्षातील महत्त्वाची पर्वणी असते. या दिवशी जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून भाविक येतात. बुधवारी दुपारी महाआरती, रात्री कावडीच्या पाण्याने नाथांना जलाभिषेक, रात्री महाआरती असे धार्मिक कार्यक्रम होतील.
या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या सप्ताहातील बाळू गिरगावकर महाराजांचे कीर्तन होणार आहे. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, संग्राम जगताप व नीलेश लंके तसेच मान्यवर उपस्थित राहतील.
रात्री जलाभिषेक माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आॅस्ट्रेलियातील भाविक राकेशकुमार, मेरठ येथील कपील शर्मा, पुणे येथील व्यंटकेश राव आदींच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, सात दिवस काशिखंड पारायण सुरू आहे. रोज सायंकाळी कीर्तन होत आहे. संतोष वनवे, म्हतारदेव आठरे, बालकीर्तनकार चैतन्य राऊत, उद्धव उगले, पंकज थोरे, पुरुषोत्तम पाटील आदी महाराजांची कीर्तन होत आहे. या सप्ताहाची सांगता गुरुवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता समाधान भोजेकर महाराजांच्या कीर्तनाने होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.